बच्चू कडू यांच्या राहुटी उपक्रमास प्रारंभ

0
78

अमरावती प्रतिनिधी । राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अभिनव अशा राहुटी उपक्रमास प्रारंभ करण्यात आला असून यात गरिबांना कल्याणकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या गावात देण्यात येणार आहे.

सर्वसामान्य जनतेचे कामे विहित मुदतीत एकाच ठिकाणी गतीने व्हावे या उद्देशाने कडू यांच्या हस्ते शिरजगाव कसबा येथे राहुटी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शिरजगाव कसबा येथील बालमुकुंद राठी विद्यालयात राहुटीचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमात पुरवठा विभाग, विद्युत विभाग, महिला व बालकल्याण, आदिवासी विकास, आरोग्य विभाग, संजय गांधी, श्रावण बाळ, तलाठी विभाग, तहसील विभाग आदी विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. यावेळी सरपंच अविनाश बदकुले, संजय झिंगरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या राहुटी शिबिरात शिधापत्रिका काढणे, वीज जोडणी अर्ज, जमिनीचा फेरफार, वृद्धांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, जातीचे दाखले तयार करणे, अतिक्रमण नियमानुकूल करुन जमिनीचे पट्टे वाटप करणे, अपंगांना प्रमाणपत्राचे वितरण, वैद्यकीय मदतीचे अर्ज भरणे, आरोग्य व महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठीचे अर्ज भरुन घेणे आदी लोकहिताची कामे केली जात असून, पंधरा दिवसात संबंधित विभागाकडून योजनांचा लाभ प्रमाणपत्र वितरीत करण्यात येत आहे. यावेळी राज्यमंत्र्यांच्या हस्ते अतिवृष्टीमुळे घराची पडझड झालेल्या नागरिकांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून गुणवंत विद्यार्थींनींना बक्षीस वितरण सुध्दा करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here