बच्चू कडू यांची अचलपुरात आढावा बैठक

0
73

अमरावती प्रतिनिधी । राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत अधिकार्‍यांना विहीत वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

राज्यमंत्री कडू म्हणाले की, पांदणरस्ते योजना व जलयुक्त शिवार योजनेतील कामे गतीने पूर्ण करावी. जलसंधारणाची कामे करत असताना तेथील खनिज आदी साहित्याचा वापर पाणंद रस्त्याच्या कामात करुन घेण्यात यावा. याबाबतचा एकत्रित प्रस्ताव गटविकास अधिकारी यांनी तातडीने सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच जुन्या व नवीन खचलेल्या विहिरींबाबत एकत्रित पंचनामे पूर्ण करावे, अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींचे सर्वेक्षण करावे, पीक विमा योजना व प्रधानमंत्री किसान योजनेच्या पात्र लाभार्थींची यादी तालुका कृषि अधिकारी यांनी ऑनलाईन द्यावी, असे निर्देश त्यांनी केले. पात्र लाभार्थींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार आणि संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here