ट्रम्प यांच्या शासकीय मेजवानीवर काँग्रेसचा बहिष्कार

0
146

नवी दिल्ली | डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती रामनाथ कोविंद मंगळवारी देणार असलेल्या शासकीय मेजवानीस काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना निमंत्रण न दिल्याच्या निषेधार्थ लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनीही निमंत्रण असून, या मेजवानीस न जाण्याचे जाहीर केले.

अधीर रंजन चौधरी म्हणाले की, मोदी अमेरिकेस गेले होते तेव्हा तेथे झालेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमास रिपब्लिकन व डेमोक्रॅट््स असे तेथील सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही पक्षांचे लोक उपस्थित होते. पण इथे भारतात मोदींनी लोकशाहीची भाषाच बदलून टाकली आहे. इथे भारत जणू एकट्या मोदींचा असल्याप्र्रमाणे फक्त मोदींचीच शोबाजी सुरु असते. काँग्रेस हा १३४ वर्षांचा जुना पक्ष आहे व आमच्या नेत्याला सर्व लोकशाही देश मान देतात. पण इथे भारतात परकीय पाहुण्यांच्या सन्मानार्थ होणाऱ्या प्रमुख सरकारी कार्यक्रमाला निमंत्रित न केले जाणे हा काँग्रेसचा अपमान आहे. ट्रम्प अहमदाबाद येथील कार्यक्रमाकडे आपल्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून पाहात आहेत आणि पंतप्रधान मोदी सरकारी पैसा खर्च करून यास मोठ्या उत्साहाने साथ देत आहेत हे निषेधार्ह आहे, असे चौधरी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here