पठाण हे औरंगजेबाचे ‘वारीस’ : मुनगंटीवारांची टीका

0
142

मुंबई प्रतिनिधी । एमआयएमचे माजी आमदार पठाण हे औरंगजेबाची ‘वारीस’ असल्याची घणाघाती टीका माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या विधानावरुन वाद निर्माण झाला होता. त्यांनतर वारिस पठाण यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य मागं घेतलं असून, थेट माफी मागितलेली नाही. यावरुन भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वारिस पठाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुनगंटीवार म्हणाले की, वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना १०० मावळे अडचणीत आणतील, असा टोला मुनगंटीवार यांनी वारिस पठाण यांना लगावला. तर वारिस पठाण यांनी माफी मागितली असती, तर बरं झालं असतं, असं म्हणत जनता त्यांना माफ करणार नाही, असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. तर पठाण हे औरंगजेबाची ‘वारीस’ असल्याची टीकादेखील त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here