वंचितला महागळती : दोन माजी आमदारांसह पदाधिकारांर्‍यांची सोडचिठ्ठी

0
140

अकोला प्रतिनिधी । वंचित बहुजन आघाडीला आज जबर धक्का बसला असून दोन माजी आमदारांसह ४५ पदाधिकार्‍यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांच्यासह ४५ पदाधिकार्‍यांनी आज वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. या संदर्भात राजीनामापत्र राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावे देण्यात आले आहे. त्या पत्रावर अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे, बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार, वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे महासचिव नवनाथ पडळकर, विधानसभा निवडणुकीतील उमेदवार इम्रान पुंजाणी, देखरेख समिती प्रमुख अर्जून सलगर, अ‍ॅड. हनुमंत वाघे यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. पक्षाची विश्‍वासार्हता संपपल्यामुळे आपण सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, एकाच वेळी दोन माजी आमदारांसह महत्वाच्या पदाधिकार्‍यांनी पक्षत्याग केल्याने वंचित बहुजन आघाडीला जोरदार हादरा बसल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here