‘आप’ लढविणार मुंबई महापालिका निवडणूक

0
73

मुंबई (वृत्तसंस्था) दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

आपचे खासदार संजय सिंह यांनी याबाबत घोषण केली. यावेळी संजय सिंह म्हणाले की, दिल्लीच्या विजयानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात पक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईसह महाराष्ट्रातील इतर महापालिका निवडणुकाही लढवण्यावर आमचा भर असेल. मुंबई पालिकेत आम्ही कुणाशीही आघाडी करणार नाही. स्वबळावरच निवडणुका लढवू. पक्ष घाईघाईत कोणताही निर्णय घेणार नाही. राष्ट्र निर्मितीच्या कार्यात आपशी जनतेने संलग्न व्हावे म्हणून एक अभियान सुरू करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने ५ दिवसांत १३ लाख लोकांना पक्ष सदस्य केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here