शिवसेना-राष्ट्रवादीची ‘वर्षा’वर तातडीची बैठक !

0
149

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीहून परत आल्याबरोबर त्यांच्या वर्षा निवासस्थानी महाविकास आघाडीची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहे.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन माध्यमांशी संवाद साधत, सीएए कायद्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली होती. तसेच त्यांनी दिल्ली भेटीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. सोनिया गांधींसोबतही उद्धव ठाकरे यांनी विविध विषयावर चर्चा केली होती. त्यामुळे त्यामुळे या कायद्यावरुन आघाडीतील सत्ताधारी तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठकीत चर्चा होईल, असा अंदाज आहे. दुसरीकडे भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेच्या तपासावरुनही चर्चा होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here