मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट

0
148

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली.

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. या १ तासाच्या भेटीच दोन्ही नेत्यांमध्ये काय नेमकी काय चर्चा झाली, याविषयी अद्याप कळू शकले नाही.

दरम्यान, पंतधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्याशी संबंधित अनेक विषयावर चर्चा झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नरेंद्र मोदींनी राज्यातील चांगल्या गोष्टी असतील, त्यामध्ये केंद्राचे सहकार्य असेल, असे आश्‍वासन दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here