मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

0
149

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्यात ते कोणत्या नेत्यासोबत काय चर्चा करणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, या बैठकीत राज्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे घेणार पत्रकार परिषद घेणार असल्याचेही कळते. दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींचीही भेट घेणार आहेत. साडेसात वाजता ते भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here