कमलनाथ यांची सर्जिकल स्ट्राईकवरून केंद्र सरकारवर टीका

0
128

भोपाळ-मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सर्जिकल स्ट्राईकवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

भोपाळमधील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, इंदिरा गांधी यांचे सरकार होते तेव्हा 90 हजार पाकिस्तानी सैनिकांनी सरेंडर केले होते. ते म्हणतात की आम्ही सर्जिकल स्ट्राईक केले. कधी आणि केव्हा केले होते सर्जिकल स्ट्राईक? त्याबद्दल विस्तारपणे सांगा. आता हे लोक राष्ट्रवादाबद्दल बोलतात. राष्ट्रवादाचा कुठला धडा शिकवणार असेही कमलनाथ म्हणाले.

मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकार ज्या एनपीआर बद्दल बोलत आहेत त्या एनपीआरची अधिसूचना 9 डिसेंबर 2019 रोजी काढण्यात आली आहे. या अधिसूचनेनंतर केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारित कायदा आणला. म्हणजेच एनपीआर हा सीएएच्या आधारित बनवला गेला आहे. म्हणून राज्यात एनपीआर लागू केला जाणार नाही असे कमलनाथ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here