इंदोरीकरांनी अनेक चुकीच्या चालीरीती बंद केल्या-ना. थोरात

0
134

संगमनेर-इंदोरीकरांनी केलेल्या प्रबोधनाच्या कामामुळे अनेक चुकीच्या चालीरीती बंद झाल्याच सांगत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी इंदुरीकर महाराजांना अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शविला.

सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदोरीकरांनी एका कीर्तनात केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर टीका होत आहे. इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणावर ना. थोरात यांनी भाष्य केलं आहे. इंदोरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याच समर्थन करता येणार नाही. मात्र गेल्या 25 वर्षांत त्यांनी केलेल्या प्रबोधनाच्या कामामुळे अनेक चुकीच्या चालीरीती बंद झाल्या. ते आज चालवीत असलेली शाळा असेल किंवा समाज प्रबोधन काम योग्य असल्याच सांगत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी इंदुरीकर महाराजांना अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शविला असला तरी समर्थन करणार नाही, असेही स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here