‘एल्गार’चा तपास एसआयटीमार्फत- गृहमंत्री

0
153

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीत अनेक विषयावर चर्चा केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

अनिल देशमुख म्हणाले, भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला असला तरी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत व्हावी यासाठी सर्वांचा आग्रह आहे. याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊन पुढील बाजू राज्य सरकार उचलणार आहेत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. केंद्र सरकारने राज्य सरकारला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. एनआयएच्या कलम १० नुसार विशेष तपास पथक नेमण्याचा राज्याला अधिकार आहे. याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय जाहीर करणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here