२०२४ मध्ये पुन्हा होणार पुलवामा सारखा हल्ला ! : काँग्रेस नेते उदीत राज यांचा दावा

0
50

नवी दिल्ली । २०२४ मध्ये पुलवामासारखा हल्ला पुन्हा एकदा होण्याची शक्यता काँग्रेसचे नेते उदीत राज यांनी वर्तवली असून यावरून केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

कालच पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास एक वर्ष पूर्ण झाले. यावरून कालच काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केंद्र सरकारला तीन प्रश्‍न विचारून या प्रकरणावरून टीका केली. यानंतर काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार डॉ. उदीत राज यांनीही पुलवामा हल्ल्याप्रकरणी संशयकल्लोळ असल्याचे स्पष्ट केले आहे. उदित राज म्हणाले कि, उपेक्षित समाजांना सत्ताधारांच्या देशभक्तीची किंमत मोजावी लागते. २०२४मध्ये पुन्हा पुलवामासारखा हल्ला होऊ शकतो. यामुळे राहुल गांधी यांनी विचारलेले प्रश्‍न योग्य असून पुलवामा हल्ल्याचा तपास झालाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या संदर्भात केलेल्या दुसर्‍या ट्विटमध्ये उदीत राज यांनी म्हटले आहे की, जे लोक गुजरातमध्ये सत्तेसाठी नरसंहार करू शकतात. ते सत्ता टिकवण्यासाठी ४० जवानांच्या प्राणांचा बळीही देऊ शकतात. यांच्यासाठी देशभक्ती आणि राष्ट्रवाद केवळ लोकांची दिशाभूल करण्याचे साधन आहे, असा आरोपही उदित राज यांनी केला आहे. उदीत राज यांच्या आरोपामुळे पुलवामा प्रकरणावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here