पंकजा मुंडे यांचे लवकरच राजकीय पुनर्वसन ?

0
41

मुंबई प्रतिनिधी । माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेत मिळाले असून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

उद्या भाजपचे राज्य अधिवेशन होत असून या पार्श्‍वभूमिवर, पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसानाचा मुद्दा समोर आला आहे. एप्रिलमध्ये विधान परिषदेच्या आठ जागा रिक्त होणार आहेत. यात भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत बीडच्या परळी मतदारसंघात पंकजा यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी त्यांना पराभूत करत विधानसभा गाठली. या निवडणुकीत स्वकियांनीच दगाफटका केल्याची भावना निर्माण झाल्यानं पंकजा पक्षावर नाराज आहेत. त्यांची ही नाराजी अनेकदा दिसून आली आहे. या पार्श्‍वभूमिवर, त्यांना विधानपरिषदेवर घेत त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here