चव्हाण दाम्पत्याने उलगडले आयुष्यातील अंतरंग ! ( व्हिडीओ )

0
45

नांदेड प्रतिनिधी । अभिनेता रितेश देशमुख माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या सौभाग्यवती अमिता यांना बोलते करून त्यांच्या आयुष्यातील अनेक अनमोल प्रसंगांना जगासमोर मांडले. या बहारदार मुलाखतीने उपस्थितांची मने जिंकली.

नांदेडचे चव्हाण आणि लातूरचे देशमुख या कुटुंबातील सख्य जगजाहीर आहे. याच दोन्ही कुटुंबातील सदस्य एका जाहीर कार्यक्रमात समोर येणार म्हटल्यानंतर याची उत्सुकता शिगेला पोहचणार हे आधीच स्पष्ट होते. या अनुषंगाने अभिनेता रितेश देशमुख याने आनंदाचे डोही या कार्यक्रमातून नांदेड येथे अशोक चव्हाण आणि त्यांच्या सौभाग्यवती अमिता यांना बोलते केले. प्रकट मुलाखतीत शंकरराव चव्हाण यांच्या खासगी आयुष्यातील अनेक प्रसंगांना अशोक चव्हाणांनी उजाळा दिला. मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर मुंबईत घर नसल्याने त्यांनी सहा अपत्ये आणि पत्नीसह आमदार निवासाच्या दोन खोल्यात संसार कसा केला याचीही आठवण सांगून येथूनच आपल्या जीवनाला कलाटणी मिळाल्याचे सांगितले. रितेश यांनी अशोक चव्हाण-अमिता चव्हाण यांची लव्हस्टोरी विचारून त्याही स्मृतींना उजाळा दिला. चव्हाणांनी रितेश यांनाही त्यांची लव्हस्टोरी कशी जुळली, असा प्रतिप्रश्‍न विचारून रितेशलाही जुन्या स्मृतीला उजाळा द्यायला लावला. रितेश यांनी दोन्ही कुटुंबांमधील संबंध उलगडून दाखविले. तर अशोक चव्हाण यांना व्हॅलेंटाईन्स डे चे निमित्त साधून गाणे म्हणून सौ. अमिता चव्हाण यांना गुलाब पुष्पदेखील द्यायला लावले.

खाली पहा : रितेश देशमुख याने घेतलेली ही संपूर्ण मुलाखत.

Live: महाराष्ट्राची मेगामुलाखत

Live: महाराष्ट्राची मेगामुलाखत

Ashok Chavan ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 14, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here