पुलवामा हल्ल्यात जायचे ते लोक गेले, नवं सरकार स्थापन झाले : राज ठाकरे

0
168

औरंगाबाद (वृत्तसंस्था) जे शहीद झाले त्यांचे दुर्दैव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळची चर्चा होती. ‘मला वाटतं जे घडायचे होते, ते घडले. जायचे ते लोक गेले. नवीन सरकार बसले, अशा शब्दात राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते.

पुलवामा हल्ला घडला की घडवण्यात आला, असा प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरेंनी वारंवार उपस्थित केला होता. या हल्ल्याला वर्ष पूर्ण होत आहे, त्यावेळी तुम्ही या हल्ल्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्या हल्ल्याबद्दल आज काय वाटते?, असा प्रश्न राज यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर काय बोलणार त्याच्यावर आता? जे शहीद झाले त्यांचे दुर्दैव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळची चर्चा होती. तसे काही पुरावे समोर आले होते. जवानांना त्या मार्गाने घेऊन जाऊ नका, अशा सूचना असतानाही तरीही त्याच रस्त्याने नेण्यात आले होते. त्याबद्दल मी प्रश्न विचारले होते,’ असे राज ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here