मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री स्वखर्चाने बसविणार शिवरायांचा पुतळा !

0
122

भोपाळ । मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे काढण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मुख्यमंत्री कमलनाथ हे स्वखर्चाने आणि सन्मानाने बसविणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली आहे.

छिंदवाडा परिसरात असलेल्या सौंसर गावाजवळ बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यावर कारवाई केल्याप्रकरणी वाद निर्माण झाले. शिवपुतळ्याच्या चौथर्‍यावर जेसीबीने कारवाई करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद देशभरात उमटले. यावरून काँग्रेसवर भाजपसह अन्य पक्षांनी जोरदार टीका केली होती. काँग्रेसच्या नेतृत्वाने कमलनाथ यांना तातडीने या गंभीर प्रकरणाबाबत निर्देश दिले होते. तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांनीही कमलनाथ यांच्याशी चर्चा केली होती. या पार्श्‍वभूमिवर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सौंसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तर कमलनाथ यांचे चिरंजीव खासदार नकुलनाथ यांनी शिवाजी महाराज पुतळा बनवणे आणि त्याची स्थापना करणे यासाठी जो काही खर्च लागेल तो स्वखर्चातून करु अशी घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. यामुळे या प्रकरणावर पडदा पडद्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here