राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी जयमाला गायकवाड

0
42

सांगोला प्रतिनिधी | माजी जि.प. अध्यक्षा जयमाला गायकवाड यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. खा.सुप्रिया सुळे व महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी निवडीचे पत्र देऊन त्यांची पदावर पुन्हा नियुक्ती केली आहे.

आमदार स्व.काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या कन्या व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांची बहीण जयमाला गायकवाड या २००७ पासून महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही प्रभावीपणे भूषविले. आपल्या काळात त्यांनी जिल्हा परिषदेस राज्यात प्रथम क्रमांकावर घेऊन जाण्यात यश मिळवले होते. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व त्यांचे बंधू दीपक साळुंखे-पाटील यांच्या खांद्याला खांदा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जयमाला प्रयत्नशील आहेत. अनेक वर्षे पक्षाशी प्रामाणिक राहून वडिलांच्या समाजकार्याचा वारसा निरंतरपणे सुरु ठेवणाऱ्या साळुंखे पाटील व गायकवाड या बहिण-भावांना राष्ट्रवादीने प्रदेश उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here