विठ्ठलसाई कारखान्याच्या चेअरमनपदी बसवराज पाटील

0
61

औसा प्रतिनिधी | उमरगा तालुक्यातील मुरूम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध पार पडली. यात चेअरमनपदी माजी मंत्री बसवराज पाटील यांची तर व्हा. चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक सादिकमियाँ काझी यांची निवड करण्यात आली.

२५ वर्षांपासून बंद पडलेला किल्लारी सहकारी साखर कारखाना २०१२ साली तत्कालीन आ. बसवराज पाटील यांनी विठ्ठलसाई कारखान्यामार्फत राज्यात सर्वाधिक भाड्याने सलग चार वर्षे चालवून कर्जमुक्त केला. किल्लारी कारखान्यावरील २८ कोटींची कर्जफेड विठ्ठलसाईच्या माध्यमातून झाली.

औसा मतदारसंघातील किल्लारीचा बंद पडलेला कारखाना बसवराज पाटील यांनी या विठ्ठलसाई कारखान्यामार्फत भाडेतत्त्वावर चालविला व लातूर-उस्मानाबद दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना चार वर्षे दिलासा दिला. इतकेच नव्हे तर कारखान्याची २८ कोटींची कर्जफेडही केली. त्यामुळे किल्लारी आणि विठ्ठलसाई या कारखान्याचे एक नाते निर्माण झाल्याने विठ्ठलसाईच्या निवडणुकीकडे औसा मतदारसंघाचे लक्ष लागले होते. या कारखान्याच्या सर्वच २१ संचालकांच्या जागा बिनविरोध निवडून आल्या. तसेच त्यानंतर गुरुवारी अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांची तर उपाध्यक्षपदी सादिकमियाँ काझी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले तर सहायक निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणून शहापूरकर यांनी काम पाहिले.

निवडीनंतर बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, ही निवडणूक बिनविरोध करून सर्व सदस्यांनी आमच्यावर मोठा विश्वास दाखविला, त्या सर्व सदस्य आणि सभासदांचे हित डोळ्यांसमोर ठेवून काम करू.’ यावेळी अध्यक्ष बसवराज पाटील, उपाध्यक्ष सादिकमियाँ अब्दुलकार काझी, नूतन संचालक बापुराव पाटील, शरण पाटील, विठ्ठलराव पाटील, केशवराव पवार, शरणप्पा पत्रिके, चंद्रकांत साखरे, दिलीप पाटील, सुभाषराव राजोळे, विठ्ठलराव बदोले, राजीव हेंबळे, संगमेश्वर घाळे, मासिकराव राठोड, रामकृष्ण खरोसेकर, शब्बीर जमादार, शिवलिंगप्पा माळी, शिवमूर्ती भंडेकर, इरम्माताई स्वामी, मंगलताई गरड यांचा सत्कार कार्यकारी संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here