मध्यप्रदेश सरकारने माफी मागावी-फडणवीस

0
54

मुंबई प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अवमान करणार्‍या मध्यप्रदेश सरकारने माफी मागावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात लावण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आल्याची घटना घडली. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यप्रदेश सरकारने माफी मागावी, अशी मागणी केली. ते येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलत हेाते. काँग्रेसकडून महापुरुषांच्या अवमानाची मालिका सुरुच आहे, मध्य प्रदेश सरकारने माफी मागून छिंदवाड्यात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करावा, अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.

दरम्यान,, फडणवीस यांनी काँग्रेसच्या शिदोरी मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेले लिखाण गलिच्छ आणि चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सावरकरांचा अपमान भाजप कधीही सहन करणार नाही. सत्तेकरिता किती लाचार राहणार, असा शिवसेनेला सवाल करत महाराष्ट्र सरकारने शिदोरी मासिकावर बंदी घालावी अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here