रवींद्र वायकर मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रमुख समन्वयक

0
5

मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रमुख समन्वयक म्हणून आमदार रवींद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रालयात भेटण्याकरिता संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक निवेदने, तक्रारी, गाऱ्हाणी घेऊन येत असतात. अशा भेटण्याकरिता येणाऱ्या सर्व नागरिकांची निवेदने, तक्रारी व गाऱ्हाणी समजावून घेऊन मार्गी लावण्याकरिता मुख्यमंत्री सचिवालयात ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तीची आवश्यकता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

जिल्हास्तरावर व विभागस्तरावर लोकांच्या तक्रारी प्राप्त करून घेण्याकरिता विभागीय मुख्यमंत्री सचिवालय सुरू करण्यात आले आहे. त्याची व्याप्ती जिल्ह्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या सर्व कार्यालयांच्या समन्वयासाठी देखील प्रशासकीय अनुभव असणारे रवींद्र वायकर काम पाहतील. रवींद्र वायकर हे मागच्या सरकारमध्ये गृहनिर्माण राज्‍यमंत्री होते. त्‍याआधी मुंबई महापालिकेतील कारभाराचा त्‍यांना प्रदीर्घ अनुभव आहे. रवींद्र वायकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातले समजले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here