मुंबईतील डबेवाल्यांना घरं मिळणार

0
43

मुंबई – डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी हक्काची जागा असायला हवी. त्यासाठी, मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सूचित केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मुंबईकरांना जागोजागी जाऊन भूकेल्यांच्या पोटात दोन घास भरवणारा मुंबईचा डबेवाला त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे साता-समुद्रापार पोहोचला आहे. त्यातूनच डबेवाल्यांकडून समाजाभिमूख कार्यातही सहभाग नोंदविण्यात येत आहे. त्यामुळेच, रोहित पवार यांनी डबेवाल्यांच्या प्रश्नाची आपुलकीने विचारपूस केली होती. आता, अजित पवार यांनी डबेवाल्यांच्या घरांसाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
मंत्रालयात आयोजित बैठकीत मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काची घरं उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मुंबई डबेवाला संघटनेचे पदाधिकारी, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी आमदार रोहित पवार यांनीही डबेवाल्यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे त्यांच्यासमवेत लोकलने प्रवासही केला होता. त्यानंतर, अजित पवार यांच्याशी डबेवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घडवून आणली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here