चव्हाण दाम्पत्याची रितेश देशमुख घेणार मुलाखत !

0
46

नांदेड प्रतिनिधी । राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण आणि त्यांच्या सौभाग्यवती अमिता देशमुख यांची मुलाखत अभिनेता रितेश देशमुख घेणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्व.डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दीच्या निमित्ताने मस्व. शंकरराव चव्हाण- त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या नजरेतून…फ या संकल्पनेतून शुक्रवारी १४ फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजता नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात याचे आयोजन करण्यात आले आहे. आनंदाचे डोही नावाने आयोजीत करण्यात आलेल्या या मुलाखतीतून डॉ. शंकरराव चव्हाण यांचे अनेक नाविन्यपूर्ण पैलू समोर येणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्व.डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समिती तसेच आ. अमर राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here