मागासवर्गीय शिक्षक भरती तात्काळ करा-डॉ राजू वाघमारे

0
37

मुंबई | प्रलंबित असलेल्या मागासवर्गीय शिक्षक भरतीच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शिक्षक भरती कृती समितीने आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली व मागील सरकारने जाणून बुजून शुल्लक तांत्रिक बाबीचा घोळ करून मागासवर्गीय शिक्षकांवर केलेल्या अन्यायाची माहिती दिली यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी शिक्षक भरती तात्काळ करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.

शिक्षक भरतीसाठी डिसेंबर २०१७ मध्ये परीक्षा होऊन मार्च २०१८ मध्ये निकालही लागला त्यानंतर सहा महिन्यांनी शासनाच्या पवित्र पोर्टलवर नोंदणीही करण्यात आली परंतु मागील सरकारच्या काळात ग्रामविकास खात्याच्या शिफारसीवरून शिक्षण खात्याने एक जीआर काढून ८००० जागापैकी ४००० जागा रद्द केल्या.
या जागा भराव्यात म्हणून वारंवार आंदोलने करण्यात आली तसेच मागील सरकारचे मंत्री, अधिकारी यांच्याशी चर्चाही झाल्या परंतु या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून डॉ राजू वाघमारेंच्या सतत संपर्कात महाराष्ट्र शिक्षक भरती कृती समिती होती, आज त्यांनी ११ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरु केले त्याची दखल घेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी मा ग्रामविकास मंत्री मुश्रीफ साहेबांना विनंती करून शिक्षण खाते व सांमान्य प्रशासन यांची ग्रामविकास खात्यासोबत संयुक्त बैठक आयोजित केली.

आज डॉ राजू वाघमारे यांनी आंदोलकांसह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली न मागासवर्गीय शिक्षक भरतीच्या प्रलंबित प्रश्न समजावून तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली.यावेळी तात्काळ शिक्षक भरतीचे आदेश देत आंदोलन मागे घ्यावे असे मुश्रीफ यांनी सांगितले तसेच सर्व संबधित खात्यांना त्याबाबत त्वरित कारवाई करावी असेही सांगितले , हा ऐतिहासिक निर्णय असून यामुळे 4000 मागासवर्गीय शिक्षकांचा नोकरीचा प्रश्न जो 2 वर्षांपासून प्रलंबित होता तो सुटला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here