महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची शाळांना आकस्मीक भेट

0
71

अमरावती । राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांना सरप्राईज व्हिजीट देऊन त्यांना मिळणार्‍या सुविधांची पाहणी केली.

महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी मेळघाटात चिखलदरा तालुक्यातील बोरी येथे अचानक भेट देऊन तेथील जि. प. शाळा व इतर यंत्रणांची तपासणी केली. मुलांना दिला जाणार्‍या आहाराची तपासणी त्यांनी केली. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कु. भारती ठाकरे ही आठवीतील विद्यार्थिनी हृदयरूग्ण असून, तिच्या उपचारांसाठी कागदपत्रे दाखल करूनही अद्याप मदत न मिळाल्याने पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. जि. प. शाळेत तीनपैकी एकच शिक्षक उपस्थित होते. एक शिक्षिका व एक शिक्षक गैरहजर आढळल्याने तत्काळ कारवाईचे निर्देश त्यांनी गटविकास अधिकार्‍यांना दिले.

तपासणीत स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे, येथील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्याचे तपासणीत आढळल्याने या स्थितीत तत्काळ सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गावातील इतर सुविधांची ही त्यांनी पाहणी केली. गावात नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जात असल्याचे तपासणीत दिसून आले. त्याबद्दल पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. कर्तव्यात कसूर होत असल्याचे आढळून आल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here