तुला लाज नाही का वाटत ? : खासदार सुप्रिया सुळे राबवणार अभियान

0
13

मुंबई । हिंगणघाट प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुला लाज नाही का वाटत या नावाने राज्यव्यापी अभियान राबवण्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडितेचा मृत्यू नसून खून असल्याची प्रतिक्रिया दिली. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात की, हिंगणघाटची घटना अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारी अशी घटना आहे. हा मृत्यू नसून खून झालेला आहे, असं मला आता वाटते. त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा गृहमंत्र्यांनी केलेला उल्लेख कृतीत येण्याची अत्यंत तातडीची गरज आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला गेला आहे. आधार म्हणून त्यांच्यासोबत उभं राहणं ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, समाजातील काही असंवेदनशील लोक अशी कृत्ये करतात, हे थांबलं पाहिजे, त्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. तसेच, आपण तुला लाज वाटत नाही का? हे छेडछाडीच्या विरोधातील एक कॅम्पेन आपण सुरु करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. छेडछाड करणार्‍यांना आपली स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. आपण सर्वजण मिळून हे कॅम्पेन यशस्वी करू. हा राजकीय नसून सामाजिक प्रश्‍न आहे, आपण सर्वजण मिळून यावर तोडगा काढू, असे म्हणत अशा घटना घडतील तिथं आणि संबंधित आरोपींना आपण शेम ऑन यू.. तुला लाज नाही का वाटत? असा प्रश्‍न आजपासून विचारूया असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here