कोल्हापुरात महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग : जिल्हा परिषद अध्यक्षपद काँग्रेसकडे

0
117

कोल्हापूर प्रतिनिधी । येथे महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला असून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेस तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावले आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील, तर उपाध्यक्षपदी सतीश पाटील विजयी झाले. भाजपचे अध्यक्षपदाचे उमेदवार अरुण इंगवले, उपाध्यक्षपदाचे उमेदवार राहुल आवाडे यांचा १७ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला दिलेला पाठींबा निर्णायक ठरल्याचे दिसून आले.

अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपला प्रथमच सत्ता प्राप्त करून दिली होती, परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने ही सत्ता पुन्हा एकदा प्राप्त केली आहे. यातून चंद्रकांत पाटील यांना मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेच्या १० सदस्यांनी काँग्रेस आघाडीला मतदान केल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांचा विजय सोपा झाला.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना काँग्रेसची १४, राष्ट्रवादीची १०, शिवसेनेची १०, शेतकरी संघटना दोन, शाहू आघाडी दोन, चंदगड विकास आघाडी एक, अपक्ष एक व ताराराणी बंडखोर आघाडी एक अशी एकूण ४१ मते मिळाली, तर भाजप आघाडीला भाजपची १३, प्रकाश आवाडे गटाची दोन, चंदगड युवक क्रांती एक, जनसुराज्य पक्ष सहा, ताराराणी आघाडी दोन अशी एकूण २४ मते मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here