माझ्याभोवती माता-भगिनींचं सुरक्षा कवच-नरेंद्र मोदी

0
14

कोकराझार वृत्तसंस्था । राहूल गांधी यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान मोदी यांनी मला किती लाठ्या मारा. ..माझ्याभोवती माता-भगिनींचं सुरक्षा कवच आहे. हे कवच मला काहीही होऊ देणार नाही असे म्हणत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मिती केली नाही तर सहा महिन्यात देशातले तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाठी-काठीने चोपतील असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना उत्तर दिलं आहे. आसामच्या कोकराझारमध्ये बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. बोडो शांतता करारानंतर प्रथमच आसाममध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामोल्लेख टाळून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार पलटवार केला. एक काँग्रेस नेता मला लाठ्याकाठ्यांनी मारण्याची भाषा करत आहे मात्र देशातील माता-भगिनींचे आशीर्वाद माझ्या मागे असल्याने अशा हल्ल्यांची भीती मी बाळगत नाही, अशा शब्दांत पंतप्रधानांनी राहुल यांचा समाचार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here