राष्ट्रवादी महिला विभागातर्फे लोणीकरांचा निषेध

0
54

शहादा प्रतिनिधी । भाजपचे नेते तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकरी व एक महिला तहसीलदाराबद्दल अपशब्द वापरून अवमान केला. म्हणून राष्ट्रवादीच्या महिला विभागातर्फे लोणीकर यांचे पोस्टर जाळून निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे यांच्या नेतृत्वात शहादा – प्रकाशा रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. आंदोलनामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली. या वेळी महिला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शितोळे यांच्यासह वंदना सौंदाणे, लता कोळी, शोभा लोहार,अनुराधा शितोळे,पुष्पा जगताप,लता मराठे,संगीता, कमलाबाई आलकरी यांनी पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here