मंत्र्यांना आलेल्या धमक्यांची समिती आढावा घेणार-गृहमंत्री

0
44

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील दोन कॅबिनेट मंत्र्यांना आलेल्या धमक्या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या समितीकडून सुरक्षेचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अनिल देशमुख म्हणाले, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि ओबीसी मंत्रालयाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना तथाकथित संघटनेकडून आलेल्या धमकीबाबतचा मुद्दा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या समितीपुढे ठेवण्यात आला आहे. ही समिती दोन्ही मंत्र्यांच्या सुरक्षेचा आढावा घेणार असून त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here