मोर सौर उर्जा प्रकल्पासाठी पनर्निरीक्षणाचे ना. राऊत यांचे आदेश

0
55

मुंबई प्रतिनिधी । मोर मध्यम प्रकल्पातील सौरऊर्जेसंदर्भात महावितरणने शासकीय जागेबाबत पुनर्निरीक्षण करुन अहवाल द्यावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले.

मोर मध्यम सौरऊर्जा प्रकल्प शासकीय जमिनीवर उभारण्यात यावा ही बाब महावितरणच्या विचाराधीन होती. तथापि, त्या ठिकाणी निकषात बसणारी जागा नसल्याने हा प्रकल्प आतापर्यंत होऊ शकला नाही. त्या संदर्भात आमदार शिरीष चौधरी यांनी महावितरणने जागेचे पुनर्निरिक्षण करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी आमदार शिरीषदादा चौधरी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक महावितरण असिमकुमार गुप्ता तसेच पाटबंधारे व जलसंपदा विभागाचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here