रेडी रेकनर दराबाबत लवकरच निर्णय- ना. थोरात

0
38

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील घरांच्या रेडी रेकनर दराबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता असल्याचे संकेत आज महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी दिले.

बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट आणि राज्यातील घरांच्या किंमती आटोक्यात राखण्याच्या अनुषंगाने रेडीरेकनरच्या दराबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासोबत थोरात यांनी दिली आहे.
राज्यातील बांधकाम व्यावसायिक आणि नागरीकांकडून मागणी केल्यास रेडीरेकनरच्या दरात वाढ किंवा घट करता येवू शकते. मात्र गेल्या दोन वर्षापासून रेडिरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली नाही. याबाबत सरकारकडे अनेक निवेदने आलेली आहेत. या सर्वांचा अभ्यास करून त्यावर निर्णय घेण्यात असल्याची माहिती ना. थोरात यांनी याप्रसंगी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here