यवतमाळमध्ये शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी 

0
50

यवतमाळ | यवतमाळ विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या ३१जानेवारी रोजी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढविणारे शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी हे विजयी झाले. त्यांनी भाजपचे सुमित बाजोरिया यांचा पराभव केला.

दुष्यंत चतुर्वेदी यांना २९८ मते मिळाली. तर, भाजपचे सुमित बाजोरिया यांना १८५ मते मिळाली. सहा मते बाद ठरली. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार प्रा, तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्याने येथील जागा रिक्त झाली होती. याठिकाणी शिवसेनेने नागपुरातील काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्रित प्रयत्न केले. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात विकास आघाडीचे बहुमत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here