नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी येणार एकत्र !

0
48

मुंबई प्रतिनिधी | एप्रिलमध्ये नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तयार झाली असून मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आता राज्यातील सर्व महापालिका आणि महानगरपालिकांमध्येही महाविकास आघाडी एकत्रच निवडणुका लढवणार आहे. एप्रिलमध्ये नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तयार झाली असून मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक घेऊन या निवडणुकीची चर्चा केली. या मेळाव्याला शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून अशोक चव्हाण, विश्वजीत कदम उपस्थित राहाणार असून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

आमदार गणेश नाईक यांनीही काही दिवसांपूर्वी आपल्या ५० नगरसेवकांची एक बैठक आयोजित केली होती. यात महाविकास आघाडीला रोखण्यासाठी काय करता येईल याची चर्चा झाली. नवी मुंबई महापालिकेच्या १११ प्रभागांपैकी शिवसेना ५०, राष्ट्रवादी ४० आणि शिल्लक २१ प्रभाग काँग्रेसच्या वाट्याला आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबाद महापालिका निवडणुकाही तोंडावर आहेत. या निवडणुकाही एकत्रच लढवणार का असे शिवेसना नेते अनिल परब यांना विचारले असता त्यांनी सांगितले, याबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बोलणी सुरु आहेत. अजून काही निर्णय झालेला नाही. प्रत्येक निवडणुकीवेळी निर्णय घेतले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here