माझ्या शब्दांत शरद पवार’ लेख व निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
107

अमरावती प्रतिनिधी | शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने ‘माझ्या शब्दात शरद पवार’ या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे पत्रकार, मुक्त पत्रकार, प्राध्यापक, ब्लाॅगर व महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या दृष्टीतील शरद पवार देशासमोर यावे यासाठी
समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांच्या दृष्टिकोनातील शरद पवार जगासमोर यावे, यासाठी या निबंध व लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर लेख व निबंध स्पर्धेत सहभाग नि:शुल्क असून, मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषेतील लेख व निबंध स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार आहे. महाविद्यालय गटासाठी ८०० ते १ हजार तर पत्रकार, ब्लाॅगर, प्राध्यापक व शिक्षक गटासाठी १ हजार ५०० ते २ हजार शब्द मर्यादा असून निळ्या व काळ्या शाईचा वापर करून स्व हस्ताक्षरातील लिहिलेले निबंध व लेख ‘शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान कार्यालय ११८४/ब गोकुल सोसायटी, ज्ञानेश्वर पादुका चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजी नगर पुणे- ४१०००५’ या पत्त्यावर २० एप्रिलपर्यंत पाेहोचतील या बेताने पाठवावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here