मी नव्हे….बाळासाहेबच खरे हिंदू हृदयसम्राट : राज ठाकरे

0
65

मुंबई प्रतिनिधी । आपल्या कोणत्याही पदाधिकार्‍याने मला हिंदू हृदयसम्राट म्हणू नये कारण बाळासाहेब हेच खरे हिंदू हृदयसम्राट असल्याचे प्रतिपादन आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. ते आगामी मोर्चाबाबतच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, मनसेतर्फ ९ फेब्रुवारीला सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकार्‍यांना आपल्याला हिंदूह्रदयसम्राट संबोधू नका अशा सूचना केल्या. पक्षाचं पहिलं महाअधिवेशन पार पडल्यानंतर अनेकांनी राज ठाकरे यांचा हिंदूह्रदयसम्राट असा उल्लेख केला होता. याच पार्श्‍वभूमीवर राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकार्‍यांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हेच खरे हिंदू हृदय सम्राट होते. दरम्यान, या बैठकीत फक्त दहा मिनिटे थांबूनच राज ठाकरे निघून गेले. त्यांची तब्येत खराब असल्याने ते लवकर गेल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here