मनसेचा 9 फेब्रुवारीला आझाद मैदानात मोर्चा

0
56

मुंबई– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनाची सांगता पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाने झाली. राज यांनी केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला जाहीर पाठिंबा तर दिलाच पण 9 फेब्रुवारीला मनसे आझाद मैदानात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार असल्याचेही सांगितले.

राज ठाकरे म्हणाले की, जे मुसलमान देशाशी प्रामाणिक आहेत ते आमचेच आहेत. यावेळी राज ठाकरेंनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या बाजूने भूमिका घेतली आणि मोदी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा देत बेकायदेशीर नागरिकांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. देशाच्या इतर भागातून सरळ लोक देशात घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लीम बाहेर काढले पाहिजे. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे. मनसे पक्ष जेव्हा स्थापन झाला तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता तो हा झेंडा होता. मी माझ्या पहिल्या सभेत सांगितले होते, तेव्हा माझे आजोबा हजर होते. त्या संघटनेला दिलेलं नाव देखील माझ्या आजोबांनी दिलं होतं. तो जो झेंडा होता तो संयुक्त महाराष्ट्र समितीने देखील वापरला होता. त्यानंतर ही समिती विखुरली आणि शिवसेना तयार झाली. पुढे जे काही घडलं ते बाळासाहेब ठाकरेंमुळे घडलं. हे सर्व करण्यासाठी जे करावं लागतं त्यासाठी माणसं असावे लागतात मी एकटा होतो. तेव्हापासून माझ्या डोक्यात हा झेंडा होता. अनेकांना वाटतात आत्ताच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा झेंडा आणला. मात्र हा केवळ योगायोग आहे. हा मुळ डीएनए आहे, तो झेंडा आणायचाच होता. मात्र, कसा आणायचा हा विचार करताना पक्षाच्या अधिवेशनात हा झेंडा आणण्याचे ठरवले.

एक गोष्ट सांगतो ही महाराजांची राजमुद्रा आहे. दुसरा कोणता झेंडा नाही. तो जेव्हा हातात घ्याल, तेव्हा तो कुठेही वेडावाकडा पडलेला दिसायला नको. आपले दोन झेंडे आहेत. निवडणुकीच्यावेळी हा झेंडा वापरायचा नाही. त्या राजमुद्रेचा मान राखलाच पाहिजे. त्याचा कुठेही गोंधळ व्हायला नको. असेही राज म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here