करजगाव | शिक्षकांकडे अशैक्षणिक कामांचा भार असल्याने ते शिक्षणाकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही,त्यामुळे अशैक्षणिक कामे लवकरच कमी करू असे आश्वासन शालेय राज्यमंत्री बच्चू कडू यांनी येथे आयोजित तालुका क्रिडा महोत्सवा प्रसंगी दिले.
चांदूरबाजार तालुक्यातील करजगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक क्रीडा महोत्सव संत गाडगेबाबा स्कूल येथे पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय शिक्षण व जलसंपदामंत्री बच्चू कडू यांनी केले.
यावेळी ना.बच्चु कडू यांनी मुलांना खेळाचे महत्व पटवून दिले. शिक्षणाचा दर्जा वाढवताना खेळाची मदत होते. त्यामुळे शिक्षणासोबत खेळाला महत्व देण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला तसेच शिक्षकांकडे असणारी शैक्षणिक कामे काढून घेण्याबद्दलचेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.