टॅपींग प्रकरणी रोहित पवारांची भाजपवर टीका

0
10

मुंबई प्रतिनिधी । फडणवीस यांच्या सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याच्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

फडणवीस सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे फोन टॅपिंग केले असल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन रोहित पवारांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राजकारण करायचे वेगवेगळे प्रकार असतात. काही जण जनहिताचे निर्णय घेतात. मग जनताच अशा नेत्यांना निवडून देते. त्यांच्या पाठिशी उभी राहते. मात्र काही जण वैयक्तिक हितासाठी सत्ता राबवतात. त्यामुळे अशा मंडळींचा जनाधार कमी होतो. मग निवडणूक जिंकण्यासाठी फोन टॅपिंगसारख्या पद्धतींचा आधार घ्यावा लागतो. अशा प्रकारच्या राजकारणाला चाणक्यनीती म्हणत नाहीत. या प्रकरणी जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई व्हायला हवी. इतक्या मोठ्या नेत्यांचे फोन टॅप होत असतील, तर मग इतरांचं काय, असा प्रश्‍नदेखील रोहित यांनी विचारला. भाजपा सरकारकडून सर्वसामान्य जनतेवरदेखील नजर ठेवली गेली असावी, अशी शंकादेखील त्यांनी उपस्थित केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here