फोन टॅपिंगची माहिती भाजपच्याच एका मंत्र्यानं दिली होती; राऊतांचा गौप्यस्फोट

0
8

मुंबई प्रतिनिधी । आपल्यासह अन्य नेत्यांचे फोन टॅप होत असल्याची माहिती आपल्याला भाजपच्या एका मंत्र्यानेच दिली होती असा गौप्यस्फोट आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांच्यासह दिग्गज नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप झाला होता. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका ट्विटच्या माध्यमातून मोठा गौप्यस्फोट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, तुमचे फोन टॅप होत आहेत. अशी माहिती मला भाजपच्याच एका वरिष्ठ मंत्र्याने दिली होती. त्यावेळी मी म्हटले होते की, माझे म्हणणे कोणी ऐकून घेत असेल तर, स्वागत आहे…मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. मी कोणतेही काम अथवा वक्तव्य लपूनछपून करत नाही. माझे म्हणणे ऐकाच.फफ असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राऊत यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here