शरद पवारांची सुरक्षा हटविली

0
9

नवी दिल्ली वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा केंद्र सरकारनं कोणतीही सूचना न देतांना हटविल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दिल्लीतील सहा जनपथ येथे शरद पवारांचं निवासस्थान आहे. तिथं दिल्ली पोलीस व सीआरपीएफचे प्रत्येकी तीन जवान तैनात होते. २० जानेवारीपासून त्यांना हटवण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे त्यांना याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. दरम्यान, पवारांसह आणखी ४० व्यक्तींची सुरक्षा हटवण्यात आल्याची माहितीही समोर आलेली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे. केंद्राने राजकीय आकसातून सरकारनं हे पाऊल उचलल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here