मुंबई | राज्य शासन इंग्रजी माध्यमांच्या शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत येत्या अधिवेशनात कायदा करण्यात येईल. असे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले पाटील, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य दादा गोरे आदींनी त्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. कायदा करताना काही उपसूचना घेतल्या जातील. २७ फेब्रुवारी रोजी हा कायदा संमत केला जाईल, असे देसाई म्हणाले.