मोदींमुळेच देशात गडबड आणि प्रगतीची पडझड ! : शिवसेना

0
20

मुंबई प्रतिनिधी । पंतप्रधान मोदींमुळे देशात गडबड आणि प्रगतीची पडझड सुरू असल्याचा टोला मारत सामनाच्या माध्यमातून शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामनाच्या माध्यमातून भाजपवर आज जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, सध्या आपल्या देशात गोंधळ, गडबड आणि पडझड असेच सगळे सुरू आहे. जागतिक लोकशाही निर्देशांकात हिंदुस्थानचा क्रमांक ५१ पर्यंत घसरला आहे. ङ्गद इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटफ (ईआययू)च्या वतीने २०१९ या वर्षासाठी जागतिक लोकशाही निर्देशांकाची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात हिंदुस्थानला ६.९० गुण मिळाले आहेत. २०१८ मध्ये हे गुण ७.२३ होते. हा निर्देशांक ठरवताना त्या त्या देशाची निवडणूक प्रक्रिया, विविधता, सरकारची काम करण्याची पद्धत, राजकीय संस्कृती, राजकीय सहभाग, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरी स्वातंत्र्य असे अनेक मुद्दे विचारात घेतले जातात. या प्रत्येक घटकासाठी मिळालेले गुण लक्षात घेऊन अंतिम क्रमवारी ठरवली जाते.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, देशाचेचे सर्वसाधारण चित्र सध्या हे असे आहे. आता जागतिक लोकशाही निर्देशांकातही हिंदुस्थानची घसरण झाली आहे. गेल्या वर्षभरात ३७० कलम, नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी वगैरे मुद्दयांवरून देश ढवळून निघाला आहे. त्याविरोधात जन आंदोलने, विद्यार्थी आंदोलने होत आहेत. जेएनयूसारखे भयंकर हल्ले करून हा आवाज दडपण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जेएनयूमधील हल्लाग्रस्त विद्यार्थ्यांना ज्यांनी सहानुभूती दाखवली त्यांना आरोपीच्या पिंजऱयात उभे केले जात आहे. देशभरात गेल्या वर्षभरात असाच गोंधळ, गडबड आणि प्रगतीची पडझड सुरू आहे. लोकशाहीची क्रमवारी ठरविणाऱयांना त्यात तथ्य वाटले असावे. म्हणूनच २०१९ मधील जागतिक लोकशाही निर्देशांकात जगात हिंदुस्थान ५१ व्या क्रमांकावर घसरला. केंद्रातील सरकार पक्ष आणि त्यांचे समर्थक आता तरी ही गडबड आणि पडझड मान्य करणार का? असा खडा सवाल या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here