यवतमाळ जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता

0
70

यवतमाळ | यवतमाळ जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी शिवसेनेच्या कालिंदा पवार तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसची क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांची बिनविरोध निवड झाली.

नामांकन दाखल करण्यासाठी दुपारी एक वाजेपर्यंत वेळ होती. मात्र या वेळेत केवळ कालिंदा पवार व कामारकर यांचेच नामांकन दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीची औपचारिक घोषणा तेवढी बाकी आहे. 18 सदस्य असलेल्या भाजपाने अखेरच्या क्षणापर्यंत काही तडजोडी होते का या दृष्टीने प्रयत्न केले. सदस्यांची बैठकही घेतली. परंतु महाविकास आघाडी एकजूट असल्याने भाजपाला यश आले नाही. महाविकासआघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेसला दोन सभापती पदे दिली जाणार आहेत. तर अन्य दोन सभापतीपदावर शिवसेनेने दावा सांगितला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here