बच्चू कडूंची पंतप्रधान मोदींवर टीका

0
62

अमरावती | प्रहार संघटनेचे नेते आणि मंत्री बच्चू कडू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्याच्या प्रकरणावरून मोदींवर कठोर शब्दांत टीका केली आहे.

येथे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, पुस्तकात दिल्याप्रमाणे कोणीही कोणाला अशी उपमा देऊ नये. मोदी स्वत:ला शिवाजी महाराजांचे भक्त किंवा सैनिक म्हणू शकतात. मात्र महाराजांशी तुलना हा शिवरायांचा अपमान आहे. पंतप्रधान मोदींनी सात जन्म घेतले तरी ते शिवाजी महाराजांच्या एका दिवसाचीच काय एका क्षणाचीही बरोबरी करू शकणार नाही. त्यामुळे याचा निषेध करत कडू यांनी पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here