नागपूर | राज्यात सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले आहे.
लोकसभा व राज्यसभेत सुधारित कायदा मंजूर झाल्यावर या कायद्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. परंतु, देशातील अनेक राज्यांनी हा कायदा लागू करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र सरकारदेखील हा कायदा राज्यात लागू करणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले, केंद्र सरकारला जी भूमिका घ्यायची आहे ती त्यांनी घ्यावी. एक राजकीय पक्ष म्हणून आमची जी भूमिका आहे ती आम्ही घेऊ, असे डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले.