सचिन सावंतांची फडणविसांवर टिका

0
90

मुंबई प्रतिनिधी । काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज एका टिक टॉक स्टाईल व्हिडीओच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे.

सध्या टिकटॉक हे अ‍ॅप तुफान लोकप्रिय झाले आहे. यात कुणीही शॉर्ट व्हिडीओ अपलोड आणि शेअर करू शकतो. साधारणत: या अ‍ॅपवर विनोदी पध्दतीत व्हिडीओ शेअर केले जातात. दरम्यान, आता राजकारणातही टिकटॉकचा वापर सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहेत. या अनुषंगाने आज काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एका शॉर्ट व्हिडीओच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस यांनी अलीकडेच महाआघाडीचे सरकार म्हणजे तीन चाकांची रिक्षा असल्याची टीका केली होती. या वक्तव्याची खिल्ली उडवतांना सचिन सावंत यांनी अहो फडणवीस, काहो फडणवीस….कसं हो फडणवीस ? असं म्हणून त्यांना खिजवले आहे. दरम्यान, सोशल मीडियात या ट्विटवर मोठ्या प्रमाणात चर्वण सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

खाली पहा : सचिन सावंत यांनी केलेले ट्विट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here