बाबासाहेबांच्या स्मारकाला मिळणार गती- उपमुख्यमंत्री अजित पवार

0
118

मुंबई प्रतिनिधी । इंदू मिल परिसरात भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२२ पर्यंत पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी सकाळी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर शेजारील इंदू मिलमध्ये जाऊन स्मारकाच्या कामाच्या पाहणी केली आणि स्मारकाच्या कामाचा आढावाही घेतला. याप्रसंगी ते म्हणाले की, स्मारकाला काही परवानग्या बाकी आहेत. त्या या महिन्यात तत्काळ दिल्या जातील. स्मारकाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. येत्या अर्थसंकल्पात स्मारकासाठी योग्य ती तरतूद केली जाईल. २०२२ पर्यंत स्मारक जनतेसाठी खुले असेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

फडणवीस यांच्या सरकारने २०२० पर्यंत स्मारक होईल, असे वचन दिले होते. मात्र, ६५० कोटींच्या स्मारकाचे काम अद्याप प्राथमिक अवस्थेतच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा २५० फूट उंच पुतळा या स्मारकात उभारण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमिवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कामाला गती देण्याचे संकेत दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here