नाशिकमध्येही महाविकास आघाडीचा डंका

0
114

नाशिक प्रतिनिधी । महाविकास आघाडीने येथील जिल्हा परिषदेत विजय संपादन केला आहे. अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर राष्ट्रवादीचे डॉ. सयाजी गायकवाड यांना उपाध्यक्षपद मिळाले.

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपने जगन्नाथ हिरे, तर उपाध्यक्षपदासाठी कन्हू गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र ऐनवेळी या दोघांनीही अर्ज मागे घेतल्यामुळे क्षीरसागर व डॉ. गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. यापूर्वीच्या अडीच वर्षांत शीतल सांगळे यांना अध्यक्षपद दिले होते, आता क्षीरसागर यांना संधी मिळाली. हे दोघेही पहिल्यांदाच निवडून आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here