पोलिसांना सर्वोत्तम सुविधा देणार-मुख्यमंत्री

0
107

मुंबई प्रतिनिधी । पोलिसांना जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ सरकारकडून दिले जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. ते पोलीस वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी पोलिस दलातील विविध पथकांनी शानदार संचलन करून मुख्यमंत्र्यांना मानवंदना दिली. याप्रसंगी मंत्री आदित्य ठाकरे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे आदी उपस्थित होतेे.

पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्यावतीने मुंबईतील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात येणार्‍या मरोळ येथील निवासस्थानाच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रीडासंकुलासह ४४८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. उध्दव ठाकरे यांनी पोलिसांच्या कार्याचा गौरव करत त्यांना जगात उपलब्ध असणारे अद्ययावत तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणासाठी पाठबळ देण्याची ग्वाही दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here